भुसावळात भुलाबाई महोत्सवात विविध स्पर्धांनी आणली रंगत


भुसावळ- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित भुलाबाई महोत्सवात विविध स्पर्धांनी चांगलीच रंगत आणली. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. शहरातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे रविवारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भुलाबाई महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी डॉ.वंदना वाघचौरे तर प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षीका महानंदा पाटील, उज्वला बागुल यांची उपस्थिती होती. बालनृत्यागंणा नुपुर भालेराव हीने नृत्याविष्कार तर नयना कळसकर हीने शिवाजी महाराजांचा पोवडा सादर करून दाद मिळवली.

विजेत्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव
विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धेत कोमल गायकवाड (प्रथम), संजना इंगळे (द्वितीय), किर्ती चौधरी (तृतीय), नास्ता प्लेट तयार करणे स्पर्धेत मोहिता चौधरी (प्रथम), योगीता चौधरी (द्वितीय), पुजेची थाळी सजवणे स्पर्धेत मोहिता चौधरी (प्रथम), अंकीता राणे (द्वितीय) तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भुलाबाई-भुलोजी किमया चौधरी (प्रथम), पार्थ चौधरी (द्वितीय) तसेच भुलाबाईची पारंपरीक गीत व नृत्य स्पर्धेत शनी मंदीर वार्ड ग्रुप (प्रथम) व अहिर सुवर्णकार महिला मंडळाने (द्वितीय) क्रमांक पटकावून स्पर्धेत यश मिळवले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

ढोल-ताशे पथकाचे सादरीकरण
यावेळी स्वररागिणी ढोल पथकचे सदस्य रोहन पाटील, आराधना टाक, उत्कर्षा गुरव , सोनू ,भावेश फेगडे यांनी ढोल-ताशे पथकाचे सादरीकरण केले.स्पर्धेच्या कार्यक्रमप्रसंगी विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कामिनी नेवे, माया चौधरी, भाग्यश्री नेवे, अनुराधा टाक, मंदाकिनी केदारे, वंदना झांबरे, अंजली नेवे, प्रतिभा विसपुते, श्रद्धा नेवे, मनिषा कुळकर्णी, कल्पना दामले, सरीता चौक, निलीमा चौधरी व अ‍ॅड.जास्वंदी भंडारी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील महीलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !