अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपीला अटक

मुक्ताईनगर : तालुक्यातील सुकळी येथील सात वर्षीय बालिकेवर 21 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना रविवारी रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी धनराज जानराव चौधरी (21, सुकळी) यास अटक करण्यात आली. आरोपीस भुसावळ अतिरीक्त सत्र नन्यायालयात हजर केले असता त्यास 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास पीडित बालिका हनुमान मंदिराच्या आवारात खेळत असताना तिला शंभर रुपये देण्याचे आमिष दाखवत मंदिराच्या वरच्या बाजूला गच्चीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. बालिका घरी न आल्याने तिचा शोध सुरू केल्याने ती गच्चीवर आढळली. या घटनेने गावात खळबळ उडाली. पीडीत बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपी धनराज चौधरी याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आरोपीला भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता आरोपीला 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड.विजय खडसे यांनी युक्तीवाद केला. तपास पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.
