वरणगावातील सिद्धेश्वर नगरात वीज चोरी : शंभरावर आकडे काढले

वीज कंपनीच्या धडक मोहिमेमुळे खळबळ : पुन्हा आकोडे टाकल्यास कारवाई होणार
वरणगाव : शहरातील सिद्धेश्वर नगर भागातील मातंग वाडा तसेच भीलवाडा भागात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याने वीज कंपनीच्या पथकाने सोमवारी धडक कारवाई करत शंभरपेक्षा जास्त आकडे काढून संबंधितांना समज देण्यात आली शिवाय पुन्हा आकोडे टाकल्यास धडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
यांचा मोहिमेत सहभाग
वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता तुषार गंजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता शीतल तायडे, लाईनमन रमेश निकम, वरीष्ठ टेक्निशीयन जितू इंगळे, दत्तात्रय पाटील, विद्युत सहाय्यक शेख सलमान शेख, कमरोद्दीन शेख, शहदाब अब्दुल करीम व ग्रामीण दोनचे कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले. सिद्धेश्वर नगर भागातील तसेच भीलवाडा, मातंग वाडा भागात वीज वाहिनीवर टाकण्यात आलेले आकोडे काढून वायरी जागीच पेटवून देण्यात आल्या. दरम्यान, वरणगाव उपविभागंतर्गत होणारी वीज चोरी टाळण्यासाठी कारवाईची मोहिम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता तुषार गजरे यांनी दिली.
