गावठी पिस्तूल व काडतुसासह कोळंब्याचा आरोपी जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
जळगाव : चोपडा तालुक्यातील कोळंब्यातील आरोपीला गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक करण्यात आली. योगेश पन्नालाल भोई (रा. कोळंबा, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सूचना व मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहम तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व्ही.पी.लोकरे यांच्या नेतृत्वात अशोक महाजन, राजेंद्र का.पाटील, हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे तसेच प्रदीप राजपूत, प्रकाश मथुरे, शेषराव तोरे, मिलिंद सपकाळे आदींनी चोपडा ते धरणगाव रोडवर शिरपूर बायपासजवळ सापळा लावून आरोपी येताच त्यास अटक केली. चोपडा शहर पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
