यावल शहरात अपक्ष उमेदवार अनिल चौधरींच्या प्रचारार्थ रॅली

माजी आमदार संतोष चौधरींचे ठिकठिकाणी सुवासिनींनी केले औक्षण
रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचारार्थ सोमवारी यावल शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. मतदारांकडून प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी मनूदेवी मंदिरात नारळ वाहून प्रचाराला सुरुवात माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात निघालेल्या प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मनू देवी मंदिर, बुरुज चौक, बारी वाडा, मेन रोड, बोरावल गेट, बसमाळा, कोर्ट रोड, सिनेमा टॉकीज आदी भागातून रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीत नगरसेवक अभिमन्यू चौधरी, माजी नगरसेवक कलीम मण्यार, उमर कच्ची, दिलीप वाणी, मनोज करणकार, राजू शेख, विजय जुनागडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, प्रचार रॅलीप्रसंगी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी मतदारांशी संवाद साधला. रावेर-यावलच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध राहू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
