विकासकामांमुळे जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठिशी

आमदार हरीभाऊ जावळेंनी प्रचार रॅलीत व्यक्त केला विश्वास : ठिकठिकाणी प्रचार रॅलींचे उत्स्फूर्त स्वागत
रावेर : रावेर विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार तथा नामदार हरीभाऊ जावळे यांनी सोमवारी तालुक्यातील अहिरवाडी, वाघोड, खानापूर, निरुळ, पाडला, चोरवड, अजनाड, बोरखेडा भागात प्रचार रॅली काढली. प्रसंगी त्यांनी मतदारांशी संवाद साधून रावेर मतदारसंघात विविधांगी कामे केल्याने जनता आपल्या पाठिशी असल्याचा आशावाद व्यक्त केला. मतदारांशी संवाद साधताना आमदार हरीभाऊ म्हणाले की, मतदारसंघात शेती, माती, रस्ते, वीज आणि पाण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात गेल्या पाच वर्षात न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
जनता आपल्या पाठिशी -आमदारांचा विश्वास
मतदारांशी संवाद साधताना आमदार जावळे म्हणाले की, शेतकर्यांच्या संदर्भात केळी करपा असेल, विमा असेल त्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून शेतकर्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. या केलेल्या कामाच्या माध्यमातून जनता मला पुन्हा आशीर्वाद देईल, असा आपल्याला विश्वास असल्याचेही मत आमदार जावळे यांनी मतदारांशी बोलताना व्यक्त केले.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
या प्रचार रॅलीत सुरेश धनके, सुनील पाटील, गोपाळ नेमाडे, संदीप सावळे, पी.के.महाजन, रंजना पाटील, पवन चौधरी, शिवसेनेचे प्रवीण पंडित, राजू लासुरकर, मधुकर चौधरी, जुम्मा तडवी, नंदा पाटील, श्रीकांत महाजन, मनोज सोनार, मधुकर बिर्हाडे, सिकंदर तडवी, जूम्मा तडवी, ईश्वर महाजन, जानकीराम पाटील, भगवान कोळी, शांताराम पाटील, गोपाळ पाटील, अमोल पाटील, सरपंच विशाल पाटील, अनिल पाटील, शिवानंद पाटील, महेश पाटील, कैलास पाटील, प्रकाश पाटील, रमेश पाटील, वासु महाजन, प्रकाश चौधरी, प्रभाकर पाटील, मनीष पाटील, शशिकांत पाटील, प्रल्हाद पाटील, विजया पाटील, चंदा पाटील आणि समस्त पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
