आमदार हरीभाऊ जावळे म्हणजे शेतकर्‍यांसह सहकार्‍यांना मोठे करणारे नेतृत्व !


मसाका चेअरमन शरद महाजन : यावल-रावेर मतदारसंघाचा विकास केल्याची माहिती

रावेर : राजकारणात काही लोकप्रतिनिधी गोरगरीब जनता, शेतकरी, सहकारी संस्था, नोकरदार वर्ग, व्यापारी बांधवांच्या हिताचा नुसता कळवळा दाखवतात, प्रत्यक्षात त्यांचा हा कळवळा बेगडी असतो. स्वत:च्या स्वार्थापलिकडे त्यांना कोणीही मोठा झालेला चालत नाही. त्यांचे खायचे दात वेगळे, अन् दाखवायचे दात वेगळे असतात. या पार्श्वभूमीवर आमचे नेते नामदार हरीभाऊ जावळे यांचे व्यक्तीमत्व, जडणघडण अतिशय प्रामाणिक वाटते. आमदार हरीभाऊ जावळे हे मनात कपट नसलेले संवेदनशील नेते आहेत म्हणूनच आम्ही त्यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसल्याचे मत मसाकाचे चेअरमन तथा माजी गृहराज्यमंत्री जे.टी.दादा महाजन यांचे सुपुत्र शरद महाजन यांनी प्रचार रॅलीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

आमदार जावळेंच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास
मसाका चेअरमन महाजन म्हणाले की, आमदार हरीभाऊ जावळे यांच्या माध्यमातून रावेर-यावल मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे. शेळगावचे काम असेल जे आता अंतिम टप्प्यात आहे, बर्‍हाणपूर अंकलेश्वर रस्ता असेल किंवा रावेर-यावलची विजेची गरज भागवणारा विरोद्याचे जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे 220 केव्हीचे सब स्टेशन असेल, सुरु असलेले आमोदा-पाल-भिकनगाव हा 99 कोटींचा रोड असो असे एक ना अनेक कामे त्यांच्या माध्यमातून झाली आहे आणि म्हणूनच आम्ही ही या विकासाच्या पर्वात सामिल होण्यासाठी त्यांच्या सोबत सहभागी झालो आहोत.

शेतकरी हितासाठी भाऊंचे काम
शरद महाजन म्हणाले की, यापूर्वी दोन वेळा खासदार असलेले हरिभाऊ जावळे यांना भाजपने आता तिसर्‍यांदा विधानसभेची उमेदवारी दिली आहे. हरिभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे जिल्ह्यातील वलयांकित नेतृत्व शरद महाजन यांनी हजारो सहकार्‍यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेतला. याम ागील भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, नामदार हरीभाऊ जावळे हे शेतकरी हितासाठी, शेतकर्‍यांच्या संस्थांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करतात. शेतकरीहित साधले जावे यासाठी त्यांच्याकडून नेहमीच प्रामाणिक प्रयत्न होतात. गेल्यावर्षी मसाकाला थकहमी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा आम्ही जवळून पाहिला आहे. शेतकर्‍यांची खरी काळजी व तळमळ असलेला हा भूमिपूत्र पुन्हा विधानसभेत दिसावा म्हणून आम्ही त्यांना साथ देतोय, असे शरद महाजन यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !