रावेर-यावल तालुक्यात नेहमीच पाळला जातो युतीधर्म

रावेर विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसुरकर
रावेर : रावेर-यावल तालुक्यातील भाजप शिवसेना पदाधिकारी यांची समन्वयाची बैठक हरीभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी भालोद येथे पार पडली. या बैठकीत सेना भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना मसुरकर म्हणाले की, रावेर-यावल तालुक्यात अगदी सुरवाती पासुनच युती धर्म पाळला जातो त्यामुळेच या मतदारसंघात युती अभेद्य आहे. हरीभाऊंकडुन सुध्दा नेहमीच सेनेला सत्तेत सहभागी करून न्याय देण्याची भूमिका वेळोवेळी घेतल्या गेली आहे त्यामुळे आम्हीही आता सर्व मिळून हरीभाऊंना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. हरीभाऊंच्या माध्यमातून सर्व समाजाला न्याय देण्याचे काम झाले आहे.हरीभाऊ हे शांत, संयमी आणि सोज्वळ व्यक्तीमत्व आहे आणि सगळ्यांना सोबत घेउन चालणारे शेतकरी नेते आहेत तेव्हा आता सर्वांनी कामाला लागुन त्यांचा विजयी पताका फडकवणारच, असा संकल्प केला आहे आणि त्यांच्या विजयासाठी सर्व महायुतीच एकवटली आहे, असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
बैठकीला रावेर विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसुरकर, शिवसेना उप जिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना तालुका प्रमुख योगीराज पाटील, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडित, रवींद्र पवार, अशोक शिंदे, रवींद्र सोनवणे, जगदीश कवडीवले, शरद कोळी, पद्माकर महाजन, सुरेश धनके, पी.के.महाजन, मुन्ना पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
