आमदार हरीभाऊ जावळेंच्या प्रचारार्थ आज नाथाभाऊंच्या तीन ठिकाणी सभा

चिनावलला दुपारी चारला तर फैजपूरात सायंकाळी सहाला तर बामणोदला रात्री नऊ वाजता सभा
रावेर : रावेर विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे यांच्या मंगळवारी रावेर-यावल मतदारसंघात तीन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली सभा मंगळवारी दुपारी चार वाजता तर दुसरी सभा फैजपूरात सायंकाळी सहा वाजता तसेच बामणोद येथे रात्री नऊ वाजता सभा होणार आहे. सभेला नागरीकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
