वरणगावात आमदार संजय सावकारेंचे सुवासिनींनी केले औक्षण

प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांसह युवक व महिलांचा सहभाग
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना रीपाई रासप व शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय वामन सावकारे यांच्या प्रचारानिमित्त वरणगावात मंगळवारी सकाळी प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी सुवासिनींनी जागोजागी आमदारांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले. या रॅलीत खासदार रक्षा खडसेदेखील सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.
भवानी मंदिरापासून रॅलीला सुरुवात
भवानी मंदिरापासून प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. प्रचार रॅली विकास कॉलनी, मदिना चौक, भोईवाडा, इस्लामपुरा, गांधी चौक, हनुमान मंदिर, माळीवाडा, चौधरी वाडा, रामजी बुवा चौक, मोठी होळी आदी परीसरातून काढण्यात आली. प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांची आशीर्वादही घेतले. प्रचार रॅलीमध्ये सर्व गटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचार रॅलीमध्ये वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, प्रशांत पाटील, शिवसेनेचे अॅड.चिकू दायमा, चंद्रकांत शर्मा, रवी सुतार, सुनील दिगंबर चौधरी, ज्ञानेश्वर मराठे, नगरसेवक गणेश धनगर, नगरसेवक बबलू माळी, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, चंद्रकांत हरी बढे, माजी सरपंच तथा नगरसेविका रोहिणी जावळे, माजी सरपंच सुभाष धनगर, संभाजी देशमुख, संजय डाहाके , गुड्डू बडे, शेख खलील, शेख मिर्झा, तळवेल येथील सरपंच डॉ.सुनील पाटील, प्रकाश शक्ती यांच्यासह हजारो कार्यकर्ते व नागरीक सहभागी झाले.
