खळबळजनक ! : नंदुरबार शहरातील गुन्हेगारी टोळीतील 16 जण हद्दपार


 

नंदुरबार : नंदुरबार शहरातील गुन्हेगारी टोळीतील 16 जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे. शहरात जातीय तणाव निर्माण करणे, यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये या टोळीचा समावेश होता. याचा आढावा घेऊन पोलिसांनी गुन्हेगारी टोळीतील 16 जणांचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला अंतिम स्वरूप देऊन दोन वर्षासाठी टोळीतील 16 जणांना हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !