रावेर ग्रामीणमध्ये आमदार हरीभाऊ जावळेंचा प्रचाराचा झंझावात

आमदारांचे ठिकठिकाणी सुवासिनींनी केले औक्षण : विजय निश्चित -अहमद तडवी
रावेर : आमदार हरीभाऊ जावळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असून हरीभाऊ हे स्वच्छ आणि चारीत्र्यवान प्रतिमेचे शेतकरी नेते आहेत. शांत, संयमी आणि सालस व्यक्तिमत्व म्हणून मतदारसंघात आणि जनमाणसात त्यांची प्रतिमा आहे. सर्व सामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने आणि आत्मीयतेने सोडवताना आम्ही त्यांना नेहमीच बघत असतो. प्रचंड उर्जा आणि उत्साहाने ते सतत कार्यमग्न असतात आणि तीच ऊर्जा ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा कायम तेवत असतात. मतदारसंघात प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील होऊन जनसामान्यांच्या प्रश्नाला सातत्याने न्याय देण्याचा प्रयंत्न निरंतर ते करत असतात. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून आहे. तडवी समाजाला जात वैधता पडताळणी प्रमाण पत्राच्या संदर्भातील त्यांचा पाठपुरावा आणि संपूर्ण तडवी समाजाला माहिती आहे. वीज, रस्ते, पाणी, शेती आणि शेतकरी या संदर्भात अनेक विकासाची कामे त्यांच्या माध्यमातून निरंतर रावेर यावल मतदारसंघात सुरू असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषदेचे माजी सदस्य अहमद तडवी यांनी रावेर ग्रामीणमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना केले.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचार रेली दरम्यान मिलिंद वायकोळे, पुष्पा वायकोळे, सुरेश धनके, राहुल चौधरी, संताबाई भारंबे, प्रशांत सरोदे, गोवर्धन ढाके, भागवत महाजन, प्रवीण पंडित, योगीता वानखेडे, पी.के.महाजन, सुनील पाटील, भारत महाजन, यशपाल धांडे, भूषण भारंबे, योगेश बोरोले, रमेश महाजन, अतुल महाजन, अमोल पाटील, सागर भारंबे, गोपाळ नेमाडे, अहमद तडवी, अमीर तडवी, प्रशांत जावळे, निलेश बक्षे, मिलिंद बक्षे, पंकज वायकोळे, घनश्याम नेमाडे, कामिनी चौधरी, संजय नेहेते, करुणा चौधरी, सरीता तायडे, बापू इंगळे, नानु माळी, आकाश चौधरी, नंदू फेंगडे, गोविंदा चौधरी, मनोज धनगर, अनिल पाटील, सरपंच संताबाई भारंबे, उपसरपंच राहुल चौधरी, सरला पाटील, मधुकर वानखेडे, भास्कर बोंडे, योगेश बोंडेे आणि सर्व शिवसेना, भाजप, रीपाई, रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
