अफवांना बळी न पडता आमदार हरीभाऊ जावळेंना विजयी करा

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे प्रचार सभांमध्ये आवाहन
फैजपूर : रावेर-यावल विधानसभेतील भाजप, शिवसेना, रीपाई, रासप, शिवसंग्रामचे अधिकृत उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ चिनावल, बामणोद आणि फैजपूर येथे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी खडसे कुठल्याही अफवांना बळी न पडता आमदार हरीभाऊ जावळेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
विकासकामांच्या जोरावर आमदार जावळेंनाच संधी
माजी मंत्री खडसे म्हणाले की, आमदार हरीभाऊ जावळे हे मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या बळावर आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार येणार आहे. या सरकारमध्ये या भागाचे प्रतिनिधी म्हणून आपणास आमदार हरीभाऊ जावळे यांनाच निवडून द्यायचे आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करण्याचा हरीभाऊंचा स्वभाव आहे, रावेर-यावल तालुक्यात गेल्या पाच वर्षात त्यांनी प्रचंड प्रमाणात विकासकामे केली आहेत. युती सरकारच्या काळात मी भूमिपूजन केलेल्या महत्वपूर्ण शेळगाव धरणाच्या बंद पडलेल्या कामास हरीभाऊंनी मोठ्या प्रमाणात निधी सरकारकडून मिळविला. पुढील काळात त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होईल. या धरणाच्या माध्यमातून शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. जनता विकास कामांना व चांगल्या माणसांना मत देते, पैशाला नाही त्यामुळे हरीभाऊच निवडून येतील, असेही ते म्हणाले.
विरोधकांकडे मुद्देच नाही
विरोधकांकडे काहीही मुद्दे नसल्याने आपल्यात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्या भूलथापांना बळी पळू नका. आपल्याला सर्वाना एकदिलाने काम करून हरीभाऊ जावळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवायचेच आहे आणि मला आपल्या कार्यकर्त्यांवर जो विश्वास आहे, तो विश्वास निरर्थक ठरणार नाही हा ठाम विश्वास मला आहे, असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी सुरेश धनके, प्रा.सुनील नेवे, नगराध्यक्ष महानंदा होले, बी.के.चौधरी, पी.के.चौधरी, हेमराज चौधरी, मिलिंद वाघूळदे, नितीन राणे, संजय सराफ, मनोज पाटील, रघुनाथ कुंभार, संजय रल, आशालता चौधरी, जयश्री चौधरी, लता मेढे, निलेश राणे, राकेश जैन, जितू भारंबे, रवींद्र होले, अनंता नेहेते, नितीन नेमाडे, राजा चौधरी, देवेंद्र साळी, सुरेश धनके, सुनील पाटील, विनोद बोरोले, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, पंडित कोल्हे, नरेंद्र चौधरी, विनोद बोरोले, संजय भावसार, सुरेश धनके, सुनील पाटील, सभापती माधुरी नेमाडे, अमोल पाटील, प्रल्हाद पाटील, भावना योगेश बोरोले, प्रमोद नेमाडे, मिलिंद वायकोळे, भरत महाजन, संताबाई भारंबे, योगीता वानखेडे, युवराज महाजन, नारायण नेमाडे, राजू पाटील, मोहन लोखंडे, विजय पाटील, राहुल चौधरी, गोपाळ पाटील, अशोक नारखेडे, मनोहर भंगाळे, प्रेमचंद भारंबे, मनीष बोरोले, दिनेश महाजन, गंगाराम राणे, संदीप महाजन, धनश्री नेमाडे, अनिता किरंगे, संदीप टोके, अहमद तडवी
व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
