काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा फसवा

केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती : भुसावळच्या सभेत आमदार संजय सावकारे यांना विजयी करण्याचे केले आवाहन
भुसावळ : गरीबी दूर करण्याचे नारे राहुल गांधी लावले मात्र गरीबी हटली नाही शवाय यापूर्वी स्व. इंदिरा गांधी व राजीव गांधींय ांनी हरीबी हटावचा नारा दिला मात्र गरीबी अद्यापही कायम असल्याने काँग्रेसचा हा नारा फसवा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांन येथे केले. लोणारी मंगल कार्यालयात आयोजित कोळी समाज मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठार आमदार रमेश पाटील, भाजपा-महायुतीचे उमेदवार तथा आमदार संजय सावकरे, नगरसेवक मनोज बियाणी, जितेंद्र कोळी, पंचायत समितीच्या उपसभापती वंदना उन्हाळे, साकरी ग्रामपंचातीच्या सदस्या निर्मला कोळी, सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रेल्वे, केळीमुळे भुसावळची ओळख
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्याकी, देशात केळीमुळे भुसावळ शहराची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीच्या सोबत सेवक म्हणून काम करीत असून आगामी निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे. कोळी समाजाने भाजपाच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी प्रसंगी केले. त्या म्हणाल्या की, सन 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी जोमाने काम सुरू केले असून गरीबांना गॅस दिले, शेतकर्यांना विविध योजना दिल्याचे त्या म्हणाल्या. 21 रोजी होणार्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार पाटील व आमदार संजय सावकारे यांनीही मार्गदर्शन केले.
