नाचतांना धक्का लागल्यान तुफान राडा : उमज गावात तरुणाचा खून

नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात सहा संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल


नंदुरबार : हळदीच्या कार्यक्रमात नाचेगाणे सुरू असताना धक्का लागल्याच्या कारणावतून झालेल्या वादानंतर एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी पहाटे नंदुरबार तालुक्यातील उमज गावात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू
उमज गावात हळदीनिमित्त मंगळवारी रात्री नाच-गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना धक्का लागल्याच्या कारणावरून इझाक उर्फ मुंडा मजनू वळवी (25) या तरुणाचा अन्य तरुणांशी वाद झाल्यानंतर संशयीतांनी इझाक यास लाथा-बुक्यांनी पोटावर, छातीवर जबर मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 29 डिसेंबर रोजी पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली.








यांच्याविरोधात दाखल झाला खुनाचा गुन्हा
याबाबत योसेफ मजनू वळवी यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयीत मायकल राजू वळवी, अंगत कृष्णा वळवी, राज मंगलसिंग वळवी, चंद्रसिंग गोपीचंद गावीत, फुलसिंग कांतीलाल गावित, क्षितिज रोशन वळवी (सर्व राहणार मोठे उमज) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !