भुसावळातील दोन टोळ्यांसह चोपड्यातील 21 उपद्रवी वर्षभरासाठी हद्दपार

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगलेंचे आदेश : शांततामय वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी निर्णय
जळगाव : भुसावळ शहरातील बंटी पथरोड तसेच पंडित गँगमधील 17 सदस्यांसह चोपड्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चौघांसह एकूण 21 उपद्रवींना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी काढले. आदेशाची अंमलबजावणी मंगळवार, 15 ऑक्टोबरपासून करावयाचे असल्याचे आदेशात नमूद आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, जळगाव शहर, रावेर, यावल, पाचोरा, भुसावळ, पारोळा, जामनेर, मुक्ताईनगर व भडगाव तालुक्यातील सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या उपद्रवींना हद्दपार करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
21 उपद्रवी वर्षभरासाठी हद्दपार
विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिसांकडून प्रांताधिकारी यांच्याकडे हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते शिवाय बंटी पथरोड व पंडित गँगचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याकडे पाठवण्यात आले होते या प्रस्तावावर संबंधितांचे म्हणणे ऐकून डॉ. उगले यांनी मंगळवारी या दोन्ही गँगच्या तडीपारीचे आदेश काढले.
पथरोड गँगमधील हद्दपार सदस्य असे
टोळी प्रमुख बंटी परशुराम पथरोड, सदस्य विष्णू परशुराम पथरोड, विजय परशुराम पथरोड, शिव परशुराम पथरोड, देवा परशुराम पथरोड, अजय परशुराम पथरोड, विशाल पूनम पथरोड (सर्व रा.वाल्मीक नगर, भुसावळ) यांचा हद्दपार झालेल्यांमध्ये समावेश आहे.
पंडित गँग अशी
टोळीप्रमुख रायसिंग सरदारसिंग पंडित, अजयसिंग उर्फ पापाराम पंडित, आकाश पंडित, गोलू उर्फ धरमसिंग पंडित, तिलक चंडाले, सोनू उर्फ जयसिंग रायसिंग पंडित, अक्षय उर्फ म्हैस की मुंडी कैलास बडगुजर, तुषार गणेश तुडनायक, सागर तिवाल, गुड्डू उर्फ करमसिंग रायसिंग पंडित यांचा तडीपारीत समावेश आहे.
चोपडा शहर हद्दीतील चौघे हद्दपार
चोपडा शहर पोलिस ठाणे हद्दीतील रूपेश गोकुळ भालेराव (पंचशील नगर, चोपडा), बंटी उर्फ प्रशांत गुलाबराव (बोरोले नगर, चोपडा), याका उर्फ याकुब युसूफ सरदार (मनियार अळी, चोपडा), अजय कैलास साळुंखे (अकुलखेडा, ता.चोपडा) यांचा हद्दपार झालेल्यांमध्ये समावेश आहे.
