पाणंद योजनेबाबत पाचोरा व भडगावात उद्या आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठक
मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ते व विविध योजनांचा आमदार घेणार आढावा

पाचोरा : महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यात गुरुवार, 30 रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व प्रमुख अधिकार्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे. या विशेष आढावा बैठकीत आमदार किशोर अप्पा पाटील हे मार्गदर्शन करतील. राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा आढाव्यासह घरकुल व विविध योजनांचा देखील आढावा आमदार किशोर अप्पा पाटील हे घेतील.
पाचोरा व भडगावात होणार बैठक
पाचोरा येथे बैठक गुरुवार, 30 रोजी सकाळी 11 वाजता स्व.राजीव गांधी टाऊन हॉल याठिकाणी तर भडगाव तालुक्याची बैठक दुपारी तीन वाजता भडगाव पंचायत समितीच्या सभागृहात होईल. या बैठकीला पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.