भाजप प्रदेशाध्यक्षांचे अजब विधान ; म्हणाले, सत्ता आल्यास 50 रुपयांमध्ये दारू देणार


नवी दिल्ली : स्वस्तात दारू देण्याची ऑफर आणि आश्वासन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मतदारांना दिल्यानंतर आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. आम्हाला मत द्या, आमची सत्ता आल्यास तुम्हाला दर्जेदार दारूही फक्त पन्नास रुपयांमध्ये देऊ, असे अनोखे आश्वासन आंध्र प्रदेशमध्येही प्रदेशाध्यक्ष वीरराजू यांनी दिले आहे. सध्या त्याच्या आश्वासनाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

विधानाची चांगलीच चर्चा
देशात भाजपची सत्ता येण्यासाठी भाजप नेत्यांकडून अनेक शक्कली, मार्गांचा अवलंब निवडणुकीत केला जात आहे. आंध्र प्रदेशमध्येही अशीच अनोखी शक्कल लढवत मतदारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी मतदारांना आश्वासने दिले आहे. आंध्र प्रदेशात भाजपची सत्ता आल्यास अवघ्या 50 रुपयांमध्ये दारू दिली जाईल. राज्यात दर्जेदार कंपनीमध्ये दर्जेदार दारू नाही. सध्या दर्जेदार दारुच्या बाटलीची किंमत 180 ते 200 रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्यात सर्वच बनावट ब्रँड्सची विक्री हीजास्त किंमतीत केली जाते.



एक कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे
आंध्र प्रदेशमध्ये 2024 च्या निवडणुकीत आमची सत्ता आणायची असेल आणि स्वस्तात दारू मिळवायची असेल तर एक कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे. आमची सत्ता आल्यास दर्जेदार दारू 75 रुपये प्रति बाटली दराने देऊ. जर राज्याचा महसूल वाढला, तर ही किंमत 50 रुपये प्रति बाटली करू, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष वीरराजू यांनी दिले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !