अपक्ष उमेदवार अनिलभाऊ चौधरींच्या प्रचारार्थ आज फैजपूरात रॅली व सभा


सायंकाळी फैजपूरात होणार जाहीर सभा

फैजपूर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचारार्थ फैजपूर शहरात बुधवारी दुपारी चार वाजता प्रचार रॅली काढण्यात आहे. फैजपूर शहरातील सुभाष चौकापासून प्रचार रॅलीला सुरुवात होणार आहे. घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रचार रॅलीला सुरुवात होणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फैजपूरात सायंकाळी होणार प्रचार सभा
अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ फैजपूर शहरातील महात्मा गांधी बहुउद्देशीय हॉल, म्युन्सीपल हायस्कूलच्या बाजूला जाहीर सभा बुधवारी रात्री आठ वाजता होणार आहे. सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन अभियंता राजूदादा तडवी, संतोष कापडे, शेख फारूक अब्दुल्ला व पदाधिकार्‍यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !