भुसावळकरांसह जळगाव जिल्हावासीयांची चिंता वाढली : एकाच दिवशी कोरोनाचे 9 रुग्ण आढळले


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले असून रुग्णांची दररोज वाढणासरी संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे. गेल्या 24 कोरोनाचे तब्बल 9 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 826 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 229 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 03
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 02
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 01
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 03
बोदवड 00
अन्य जिल्हा 00






मुक्ताईनगरात तीन कोरोना रुग्ण आढळले
मुक्ताईनगर शहरातील शनिमंदिरर परीरातील रहिवासी असलेले तिघांची गुरूवारी कोरोना अ‍ॅन्टीजन चाचणी पॉझीटीव्ह आल्याने या परीसरात खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांना तातडीने जळगाव येथे उपचारार्थ पाठविण्यात आलेले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.योगेश राणे यांनी दिली. शनिमंदीर परीसरात आरोग्य कर्मचारी पाठवून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे शिवाय बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अमितकुमार घडेकर यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !