मुक्ताईनगरात स्व.निखील खडसे यांना जयंतीनिमित्त अभिवादन


मुक्ताईनगर :  स्व.निखील खडसे यांना जयंतीनिमित्त शहरात अभिवादन करण्यात आले. स्व.निखील खडसे स्मृतीस्थळ, आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याहस्ते स्व.निखील खडसे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

अ‍ॅड.रोहिणी खडसेंनी केले स्वप्न पूर्ण
प्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील म्हणाले की, एकनाथराव खडसे यांनी स्थापन केलेल्या आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे निखील खडसे हे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सूतगिरणी इमारतीचे बांधकाम व इतर बाबी पुर्ण केल्या. स्थानिक युवक व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा हे त्यांचे स्वप्न होते मात्र हे स्वप्न अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी सूतगिरणीचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून साकारले.



संकटात धावून जाणारा स्वभाव : अ‍ॅड.रोहिणी खडसे
अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, स्व.निखील खडसे हे मितभाषी व्यक्तीमत्व होते. कुणीही मदत मागितली आणि कोणतेही संकट असले तरी संकटात असणार्‍या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचा त्यांचा स्वभाव होता. त्यासाठी ते कोणतेही पक्षीय मतभेद बघत नसत. स्व.निखील खडसे यांचे संघटन कौशल्य उत्तम होते आज जिल्ह्यात वा राज्यात फिरत असताना त्यांनी जोडलेले युवक भेटून स्व.निखील भाऊ यांच्या आठवणी जागवत असतात. आज स्व.निखील हे सोबत नसले तरी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या रूपाने ते आमच्या सोबत असल्याचे त्या म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, जळगाव राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, पंचायत समिती सभापती विकास पाटील, किशोर गायकवाड, गणेश पाटील, विनोद पाटील, राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाणे, दीपक पाटील, प्रदीप साळुंखे, दुध संघ संचालक मधुकर राणे, डॉ.प्रांजल खेवलकर, राजु सूर्यवंशी, राजु माळी, अतुल पाटील, शिवराज पाटील, चंद्रकांत बढे, विलास धायडे, विनोद सोनवणे, जि.प.सदस्य निलेश पाटील, दिलीप माहेश्वरी, सुनील माळी, सुनील पाटील, गणेश तराळ, उमेश राणे, सोनू पाटील, प्रवीण पाटील, डॉ.प्रदीप पाटील, अनिल पाटील, बापू ससाणे, मनोज तळले, संजय कपले, संजय कोळी, रणजीत गोयंका, वाल्मिक भोलाणकर, गोपाळ पाटील, सुनील काटे, संदीप जावळे, गोपाळ गंगतिरे, रवी खेवलकर, कल्पेश शर्मा, अतुल बढे, प्रेमचंद बढे, वासुदेव बढे, विनायक पाटील, शकील खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात ओबीसी आरक्षण वगळून मार्चमध्ये महापालिका निवडणुका होणार ! 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !