भुसावळ ग्रामीणमध्ये अपक्ष उमेदवार सतीश घुलेंचा मतदारांशी संवाद

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी भुसावळ शहर व ग्रामीण भागात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. बुधवारी दुपारनंतर त्यांनी तालुक्यातील फुलगाव, पिंपळगाव, काहुरखेडा, फुलगाव तसेच पिंपळगाव व जाडगावात जावून मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी उमेदवार घुले यांनी परीवर्तनासाठी आपली उमेदवारी असल्याचे सांगत मतदारांकडे कौल मागितला. याप्रसंगी त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. ठिकठिकाणी मतदारांनी त्यांना आशीर्वादही दिले.
यांचा होता सहभाग
अपक्ष उमेदवार सतीश घुले यांच्या प्रचार रॅलीत प्रशांत बर्हाटे, महेश जाधव, किशोर तळेले, राजेश चौधरी, सुनील रायकवार, दिलीप टाक, निलेश इंगळे, विवेक गवळी, जमील बागवान, अजय ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
तरुणांसह वयोवृद्धांचाही सहभाग
अपक्ष उमेदवार सतीश घुले यांना भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून त्यांच्या प्रचार रॅलीत तरुणांसह वयोवृद्धांचाही लक्षणीय सहभाग वाढलेला दिसून येत आहे.
