फैजपूर शहरात अपक्ष उमेदवार अनिल चौधरींच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

फैजपूर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी बुधवारी फैजपूर शहरात प्रचार रॅली काढल्यानंतर मतदारांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी पुतळास हार अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली. फैजपूर येथे निघालेल्या रॅलीत सर्व क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अनिलभाऊ चौधरींचे सुवासिंनींनी केले स्वागत
अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या बुधवारी निघालेल्या प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले शिवाय सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. संपूर्ण फैजपूर शहरात रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीत नगरसेवक कुर्बान शेख, नगरसेवक रशीद तडवी, राजू तडवी इंजिनिअर, माजी नगरसेवक कलीम मण्यार, माजी नगरसेवक संतोष कापडे, सुनील वाढे, गणेश तेली, फारूक अब्दुल्ला, पिंटू तेली, लखन मांड वाले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, प्रचार रॅलीप्रसंगी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी मतदारांशी संवाद साधला. रावेर-यावलच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध राहू शिवाय बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
