फैजपूरच्या शैक्षणिक विकासाबरोबर औद्योगिक विकासाला गती देणार

आमदार हरीभाऊ जावळे यांची ग्वाही : शहर व ग्रामीण भागात मतदारांशी साधला संवाद
फैजपूर : संत-महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फैजपूर नगरीच्या विकासाला नेहमी साथ दिली आहे, फैजपूरवासीांनी देखील माझ्यावर तितकेच प्रेम आणि स्नेह केले आहे, नगरपालिकेच्या विविध विकास योजनांच्या संदर्भात, समस्यांबाबत आग्रही भूमिका ठेवली आहे. संत परंपरा असलेल्या या नगरीत विकासाची दृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधीला वाव मिळाला असल्याचे मत आमदचार हरीभाऊ जावळे यांनी फैजपूर येथील रॅॅलीप्रसंगी व्यक्त केले. फैजपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतांना त्यांनी सांगितले की, विकासकामांच्या बाबतीत मी नेहमी कटीबद्ध आहे, समाज हितासाठी माझा दृष्टीकोन सकारात्मक आहे आणि राहील, सर्व जाती धर्मांना सोबत घेवून चालण्याचा माझा स्वभाव आहे. फैजपूर रावेर-यावल तालुक्याला जोडणारा दुवा आहे. या ठिकाणी शेतकरी,कष्टकरी,समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका असल्याचे मत त्यांनी मतदारांशी बोलताना व्यक्त केले.
विकासाला गती देणार -आमदार
आमदार जावळे म्हणाले की, फैजपूरच्या शैक्षणिक विकासासोबत औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज आहे, आगामी काळात विकासाला अधिक गती देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बुधवारी फैजपूर येथे भाजपा-शिवसेना, रासप, महायुतीचे उमेदवा रआमदार जावळे यांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी मतदारांशी आमदारांनी संवाद साधला.
यांचा रॅलीत सहभाग
नगराध्यक्ष महानंदा होले, मसाकाचे संचालक नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पांडुरंग सराफ, मिलिंद वाघूळदे, निलेश राणे, दुध संघाचे संचालक हेमराज चौधरी, नगरसेविका वत्सला कुंभार, माजी तालुका अध्यक्ष नितीन राणे, माजी जि.प.सदस्य भरत महाजन, देवा साळी, शहराध्यक्ष संजय रल, महिला आघाडी अध्यक्षा जयश्री चौधरी, वैशालीताई, मोहिनी पाटील, नितीन नेमाडे,पप्पू चौधरी, अनंता नेहते, विनोद बोरोले, रवींद्र सरोदे, संजय सराफ, राजाभाऊ चौधरी, राकेश जैन, रवी होले, जितेंद्र भारंबे तसेच अट्रावल येथील मिरवणुकीत मसाका चेअरमन शरद महाजन,पुरजित चौधरी, गोपाळ नारखेडे, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, धनाभाऊ कोळी, किरण महाजन, हिरालाल चौधरी, डॉ.नरेंद्र कोल्हे व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
