पाच वर्ष पाठीशी भक्कम राहणारे आमदार संजय सावकारेच विजयी होणार

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ग्वाही : भुसावळातील सर्वच उमेदवारांनी तिकीटासाठी आशीर्वाद मागितल्याचा दावा
भुसावळ : भुसावळातील सर्वच उमेदवारांनी माझे आशीर्वाद घेतले व मी देखील त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला मात्र गेल्या पाच वर्षांपासून माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणारे आमदार संजय सावकारे हेच या निवडणुकीत हॅट्रीक साधतील, असा विश्वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केला. नेहरू मैदानावर आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री त्यांची प्रचार सभा झाली.
डॉ.मानवतकर चौधरींच्या प्रेमात पडलेच कसे?
माजी मंत्री खडसे म्हणाले की, सुरुवातीला डॉ.मानवतकर आपल्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते व आपण त्यांना निवडणूक लढवणे सोपे नाही, अपक्ष उभे राहू नका, असा सल्लाही दिला होता मात्र काही दिवसांनी ते पुन्हा माझ्याकडे आले व त्यांनी मला एकाकडून शब्द मिळाला असल्याचे सांगून भाजपाकडून तिकीट मिळत असल्याचा दावाही केला होता, असे खडसे यांनी सांगत नाथाभाऊ अद्यापही पार्लमेंटरी बोर्डात आहे त्यामुळे आमदार सावकारेंचेे तिकीट कट होईलच कसे ? असे सांगून त्यांनी उमेदवारांचे तिकीट वाटप आपल्याला विश्वासात घेवूनच करण्यात आल्याचे ते म्हणाले. डॉ.मानवतकरांसारखा चांगला माणुस चौधरींच्या प्रेमात पडलाच कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आमदार सावकारे भाग्यवान माणुस
माजी मंत्री खडसे म्हणाले की, आमदार सावकारे हे भाग्यवान आहे. 2014 मध्ये ते मंत्री पदावर असताना आपण त्यांना पदाचा राजीनामा देवून भाजपात आणले व त्यावेळी सामूहिक निर्णयामुळे युती तोडण्याचा निर्णय झाला मात्र निर्णय सांगण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याने (मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण) मीच पुढे आलो, अशी स्पष्टोक्ती खडसेंनी दिली. सावकारे भाजपात आल्यानंतर ते विजयी झाले व आता तिसर्यांदादेखील तेच विजयी होतील, असा विश्वासही खडसेंनी व्यक्त केला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह भाजपाचे नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू (निर्मल) कोठारी, पिंटू ठाकूर, अॅड.बोधराज चौधरी, मनोज बियाणी, किरण कोलते, निक्की बत्रा, अॅड.श्याम गोंदेकर, विजय चौधरी, शफी पहेलवान, अनिकेत पाटील, गिरीश महाजन, रजनी सावकारे, शैलजा पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
