पाच लाखांची लाच भोवली : शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सहसंचालक एसीबीच्या जाळ्यात
मुंबई : पाच लाखांच्या लाच मागणीप्रकरणी वांद्रे येथील शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सह संचालक अनिल मदनजी जाधव (52) यांनी एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या पोहोचा मंजुरीकरीता ही लाच मागण्यात आल्याचे सांगण्यात आले.
लाच स्वीकारताच अटक
तक्रारदार हे टेंडर स्किन इंंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अकॅडमीमध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अकॅडमी व त्याअंतर्गत घेण्यात येणार्या वेगवेगळ्या कोर्सच्या मंजुरी करता जाधव यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून 2021 मध्ये पूर्व मंजुरी प्राप्त झाली. याप्रकरणात अंतिम मंजुरी करता जाधव याने पाच लाखांची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांनी 7 डिसेंबर रोजी एसीबीकडे धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार, 14 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान जाधव यांनी पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, मंगळवारी पाच लाखांची रक्कम स्वीकारताच एसीबीने अटक केली.




