ओरीसाच्या महिला प्रवाशाचा पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये मृत्यू
भुसावळ : पुरी-अहमदबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या दीप्ती नवीनचंद्र पाढी (53, रा.जुनागड, कलहंडी, ओरीसा) या महिला प्रवाशाची प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात सोमवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
उपचारापूर्वीच प्रवाशाचा ओढवला मृत्यू
रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म दोनवर पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस ही गाडी रविवारी रात्री नऊ वाजेच्या पूर्वी आली असता गाडीच्या एस- 5 या डब्यातील 41 क्रमांकाच्या सीटवरून प्रवास करणार्या दीप्ती पाढी यांची प्रकृती खालावली असल्याने भुसावळ स्थानकावर रेल्वे हॉस्पीटलमधील डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. महिला प्रवाशाची तपासणी केली असता प्रवासी महिलेचा मृत्यू झाल्या असल्याचे जाहीर करण्यात आले. मृतदेह जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. लोहमार्ग पोलिस ठाण्यात उपस्टेशन मास्तर यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहा.फौजदार बबन शिंदे करीत आहेत.





