राष्ट्रवादीने दिली विरोधी पक्ष नेतेपदाची ऑफर : एबी फार्मही आणला

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची माहिती : भुसावळात आमदार संजय सावकारेंच्या प्रचारार्थ सभा
भुसावळ : सलग सहा वेळा आमदारकी, 12 खात्यांचे मंत्री पदे पक्षाने दिल्याने आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत व राहू. तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला, अपक्ष उभे रहा यासाठी आग्रह धरला तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपल्यासाठी ए.बी.फॉर्म आणला होता व अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी आपली वाट पाहिल ीतसेच विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर देवू केली, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी भुसावळातील नेहरू मैदानावर भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार सभेत केला. मुक्ताईनगरात अखेरच्या क्षणी रवींद्र भैय्या यांना उमेदवारी देण्यात आली मात्र राष्ट्रवादीची दैनावस्था झाल्याने अखेरच्या क्षणी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला, असेही ते म्हणाले.
