नेवासा येथील अधिवेशनास जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते जाणार


विकास महाजन : भुसावळातील बैठकीत दिली माहिती

भुसावळ : अ.भा. ग्राहक पंचायतीचे नगर जिल्ह्यातील नेवासा येथे आयोजीत प्रांत अधिवेशनास जळगाव जिल्ह्यातून बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार आहेत. यासाठी तालुकास्तरीय बैठकींचे आयोजन केले जात असल्याची माहिती राज्य ग्राहक संरक्षण परीषदेचे वरीष्ठ सदस्य व ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांनी भुसावळातील बैठकीत दिली शहरातील अग्रसेन भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विकास महाजन होते.

9 व 10 नोव्हेंबर रोजी वार्षिक अधिवेशन
महाजन यांनी नगर जिल्ह्यातील नेवासा येथे 9 व 10नोव्हेंबर अशा दोन दिवसीय मध्य महाराष्ट्र प्रांताचे वार्षिक अधिवेशन होत असल्याची माहिती दिली. या अधिवेशनास जळगाव जिल्ह्यातून किमान दोनशेवर कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. अधिवेशनात सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यात आली तर यावेळी प्रकाश फेगडे यांनी दिलेल्या तक्रारी संदर्भात चर्चा विनिमय करून फसवणूक करणार्‍यांवर योग्य कारवाईबाबत निर्णय घेण्यात आला.

भुसावळात लवकरच ग्राहक मेळावा
बैठकीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये भुसावळात लवकरच ग्राहक मेळावा, 25 ऑक्टोंबरला जिल्हास्तरीय बैठक यासह विविध विषयांचा समावेश आहे तसेच यावेळी नवीन सदस्य नोंदणी व पदाधिकार्‍यांची नियुक्ति करण्यात आली. यामध्ये तालुका संघटकपदी उज्वला बागुल, सहसंघटक हर्षल गोराडकर यांचा समावेश आहे. बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्यासह उपस्थितांनी अभिनंदन केले. सूत्रसंचलन तालुकाध्यक्ष अ‍ॅड.कल्पना टेमानी व आभार सचिव अ‍ॅॅड.जास्वंदी भंडारी यांनी मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !