बुली बाई अॅपचा मास्टरमाईंडच्या पोलिसांच्या कारवाईबाबत मोठे वक्तव्य ; म्हणाला…
मुंबई : मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करणार्या बुली बाई अॅपचे (Bulli Bai App) प्रकरण देशात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बुली बाई अॅपचा मास्टरमाइंड नीरज बिश्नोई याला अटक केली होती. दरम्यान, आरोपी निरज यांनी ट्विटर हॅण्डलवरून मुंबई पोलिसांनी केलेली अटक चुकीची असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे.
आतापर्यंत तीन आरोपींना अटक
बुली बाई अॅपचे (Bulli Bai App) ट्विटर हॅण्डल बनविणार्या मुख्य आरोपी श्वेता सिंहसह मयंक रावत (21) आणि विशाल कुमार झा (22) या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध पोलिस (Police) घेत आहेत. पोलिसांकड़ून अन्य आरोपींचा शोध सुरू असताना, दिल्ली पोलिसांनी अॅप (Bulli Bai App) बनविणार्या बिश्नोई याला अटक केल्यानंतर अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे.


या लाचखोर अधिकार्याच्या घरात आढळले चक्क इतक्या कोटींचे घबाड…!
ट्वीटवरून आरोपीचा काढला माग
दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिश्नोईने @giyu44 या अकाउंटवरून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी दोघांचा सहभाग नसल्याचे सांगितले आहे. याबाबत त्याने अनेक ट्विट केले आहे. त्यानुसार, दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत. नीरज हा मूळचा जोरहाटचा राहणारा असून, तो भोपाळमध्ये शिकतो. त्यानेच बुली बाई हे अॅप गिटहब प्लॅटफॉर्मवर निर्माण केले. तसेच तो बुली बाईचा (Bulli Bai App) मुख्य ट्विटर अकाउंट होल्डरही आहे, असे पोलिसांनी सांगितले. नीरजला दिल्ली पोलिसांच्या (Dilli Police) इंटेलिजन्स युजन अँड स्ट्रॅटेजिक शाखेने अटक केली. त्याने हे अॅप (App) तयार केल्याची कबुली दिली. त्याच्या लॅपटॉपमध्ये या अॅपचे काही पुरावे सापडले आहेत, असे उपपोलीस आयुक्त (आयएफएसओ) के. पी. एस. मल्होत्रा यांनी सांगितले.
महिलांची यादीच केली तयार
या अॅप प्रकरणात (Bulli Bai App) कथित सहभागाच्या आरोपावरून आतापर्यंत नीरज बिश्नोईसह 4 जणांना अटक झालेली आहे. या अॅपवर शेकडो मुस्लीम महिलांची लिलावासाठी यादी बनवण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केलेल्या इतर 3 जणांमध्ये उत्तराखंडमधील 18 वर्षांच्या श्वेता सिंह या तरुणीचा समावेश आहे. या प्रकरणी ही तरुणीही मुख्य आरोपी आहे.
देवळाली ऐवजी भुसावळ-ईगतपुरी मेमू सोमवारपासून धावणार





