भुसावळात घरफोड्या करणारा बुलढाणा जिल्ह्यातील अट्टल घरफोड्या जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : कुविख्यात घरफोड्याने आतापर्यंत दोन डझनावर केल्या घरफोड्या
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत दोन घरफोड्या करणार्या तसेच बुलढाणा जिल्ह्यात दोन डझनाहून अधिक घरफोड्या करणार्या आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. प्रमोद देवेंद्र इंगळे (36, रा.चिखला, ता.बुलढाणा) असे अटकेतील आरापीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेने आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
यांच्या पथकाने केली आरोपीस अटक
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या नेतृत्वात राजेंद्र का.पाटील, अशोक महाजन, हवालदार विजय पाटील, अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, नरेंद्र वारुळे, रमेश चौधरी, दिनेश बडगुजर, मिलिंद सोनावणे, मुरलीधर बारी आदींच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
चिखला गावातून आवळल्या मुसक्या
आरोपी प्रमोद देवेंद्र इंगळे (36, रा.चिखला, ता.बुलढाणा) हा जळगाव जिल्ह्यात येवून घरफोड्या करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिखला गावातून आरोपीच्या गोपनीय माहितीवरून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीने पोलिस चौकशीत भुसावळ शहरात दोन घरफोडी केल्याचे प्राथमिक चौकशीत कबुल केले आहे तर बुलढाणा जिल्ह्यात दोन डझनावर घरफोड्या केल्याचे कबूल केले. भुसावळ बाजारपेठ पेठ पोलिस ठाण्यात भाग पाच गुरनं.482/2019, भादंवि 457, 380 या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून एलईडी टीव्ही जप्त करण्यात आला असून त्यास तपासार्थ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
