भुसावळ ग्रामीणमध्ये अपक्ष उमेदवार सतीश घुलेंचे सुवासिंनींनी केले औक्षण

प्रचार रॅलीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद : परीवर्तनासाठी मागितला कौल
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी भुसावळ शहरासाहेबतच ग्रामीण भाग प्रचारासाठी पिंजून काढला आहे. वैयक्तिक मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. गुरुवार, 17 रोजी दुपारी तालुक्यातील जाडगावसह मन्यारखेडा, साकरी व कुर्हा गावाला भेट देत मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी मतदारांशी हितगुज करीत त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. सकाळी 11 वाजेपासून त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली.
परीवर्तनासाठी कौल द्या -सतीश घुले
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या गाठी-भेटी घेत आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी मतदारांशी संवाद साधतांना सांगत आहेत.
प्रचार रॅलीत या पदाधिकार्यांचा सहभाग
अपक्ष उमेदवार सतीश घुले यांच्या प्रचार रॅलीत प्रशांत बर्हाटे, महेश जाधव, किशोर तळेले, राजेश चौधरी, सुनील रायकवार, दिलीप टाक, निलेश इंगळे, विवेक गवळी, जमील बागवान, अजय ठाकूर, प्रभाकर रणदिवे, प्रतीक पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
