शेंदूर्णी दूरक्षेत्राच्या लाचखोर पोलिसासह पंटरला एका दिवसाची पोलिस कोठडी


वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी मागितली होती दोन हजार शंभर रुपयांची लाच

जळगाव : तक्रारदारासह कुटुंबियांच्या विरोधात निघालेल्या वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी दोन हजार शंभर रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शेंदूर्णी दूरक्षेत्रातील पोलिस नाईक गजानन काशिनाथ पवार (रा.प्लॉट नं.47, सप्तश्रृंगी गगर, निर्मल रेसीडेंसी हॉटेलच्यामागे, भडगाव रोड, पाचोरा) तसेच खाजगी पंटर कडुबा लक्ष्मण पाटील (52, रा.गोंधळपुरा, शेंदुर्णी, ता.जामनेर,जि.जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 13 रोजी आरोपींनी लाच मागितल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर 16 रोजी आरोपींना शेंदुर्णीसह जळगावातून अटक करण्यात आली होती. तपास पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !