यावलसह रावेर तालुक्यात प्रशासनातर्फे उद्या कार्यशाळा
फैजपूर- यावल व रावेर तालुक्यात शनिवार, 10 रोजी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार रक्षा खडसे, आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, तसेच जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावल शहरात सकाळी साडेनऊ वाजता धनश्री चित्र मंदिरात तर रावेर शहरात दुपारी तीन वाजता माजी सैनिक सभागृहात कार्यशाळा होईल. या कार्यशाळेमध्ये विविध यंत्रणांनी सुचवलेल्या गावांच्या कामाचा आराखडा अवलोकनार्थ ठेवला जाणार आहे. या आराखड्यात परीसंवाद चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील व तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस यावल व रावेर तालुक्यातील प्रत्येक गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था गट प्रतिनिधी आदींनी उपस्थिती, असे आवाहन प्रशासनातर्फे प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबाले यांनी केले आहे.