भुसावळात आमदार संजय सावकारेंनी कॉर्नर बैठकीद्वारे नागरीकांशी साधला संवाद

भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आमदार सावकारे यांनी नागरीकांशी संवाद साधला. भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, माजी राजेंद्र दत्तु आवटे, नगरसेवक युवराज लोणारी, मनोज बियाणी, किरण कोलते, मुकेश गुंजाळ, गुड्डू शेठ अग्रवाल नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
