वाराणसी एक्स्प्रेसचा अपघात टळला


वातानुकूलित डब्याच्या स्प्रिंगला तडे : दोन तासांच्या विलंबाने गाडी रवाना

भुसावळ : डाऊन 20903 वडोदरा (बडोदा) वाराणसी एस्प्रेसच्या वातानुकूलित बोगीतील स्प्रिंगला तडे गेल्याची बाब भुसावळात गाडी आल्यानंतर लक्षात आल्यानंतर सुदैवाने अप्रिय घटना टळली. गुरुवारी पहाटे 4.10 वाजेच्या सुमारास गाडी क्रमांक 20903 बडोदा-वाराणसी एक्स्प्रेसचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर एक्झामिनिशनदरम्यान लक्ष्मण प्रल्हाद या टेक्नीशीयनला इंजिनानंतरचा वातानुकूलित डबा एफ- 1 (071260) च्या स्प्रिंगला तडे गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वरीष्ठांना माहिती दिली. या प्रकारानंतर स्टेशन संचालक जी.आर.अय्यर तसेच सहाय्यक मंडळ यांत्रिक अभियंता एस.एस.पवार यांनी तातडीने धाव घेतली. तडा गेलेल्या स्प्रिंगला तातडीने बाजूला करून नवीन स्प्रिंग बसवल्यानंतर दोन तासांच्या विलंबाने गाडी 6.20 वाजता पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली. कर्मचार्‍याने दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !