पायाला आले फोड मात्र रावेरातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरींचा प्रचाराचा झंझावात कायम


यावलमध्ये प्रचार रॅलीला प्रतिसाद : सुवासिनींनीकडून ठिकठिकाणी औक्षण

रावेर : रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिलभाऊ चौधरी यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पायपीट करीत चालताना त्यांच्या पायांना फोडे आली तर आता आता हे फोड फुटून तळपायाला गट्टे पडले मात्र त्याकडेही दुर्लक्ष करत त्यांनी 19 ऑक्टोबरच्या नियोजीत वेळेपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला आहे. दररोज सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत सलग प्रचार, तर मध्यरात्री दीड वाजेपर्यंत गाठीभेटीतून त्यांनी मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी सकाळी मतदारा संघातील उत्तर- पूर्व भागातील प्रचारानंतर सायंकाळी त्यांनी यावल शहरात भव्य रॅली काढल्यानंतर मतदारांनी या रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद दिला तर ठिकठिकाणी त्यांचे सौभाग्यतींनी औक्षण करीत त्यांना आशीर्वादही दिले.

पायाला भिंगरी लावून प्रचार
रावेर यावल मतदार संघात अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे टिव्ही या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. त्यांनी प्रचाराच्या काळात पायाला भिंगरी लावून प्रचार सुरु केला आहे. गुरुवारी त्यांनी रमजीपूर, रसलपूर येथे भेट देवून रावेरमध्ये कोअर टिमसोबत चर्चा केली तर फैजपूरात कार्यकर्त्यांना भेटून ते दुपारी तीन वाजता भुसावळात आले. यानंतर पुन्हा सायंकाळी यावल शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली. भुसावळ रोडवरील फालक नगरजवळील अनिल चौधरींच्या प्रचार कार्यालयाजवळ तब्बल साडेतीन हजार कार्यकर्त्यांसोबत शहरातील प्रमुख मार्गावरुन सिनेमा रोड, बाबुजी पुरा, फालक नगर, सुतारवाडा, महाजन गल्ली, खाटीक गल्ली, सुदर्शन टॉकीज परीसर, बाहेरपूरा भाग, कोर्ट भाग, वाणी गल्ली, देशपांडे गल्ली, देशमुख वाडा, चावडी परीसर भाग आदी मार्गाने रॅली काढण्यात आली. या रॅलीत विशेषकरून तरुण मतदारांचा उत्साह अधिक होता. काही कार्यकर्त्यांनी तर अनिल चौधरींचे निवडणूक चिन्ह असलेले टिव्ही उचलून धरला होता. गवत बाजार परीसरात रॅलीचे सभेत रुपांतर झाले.

यांची होती उपस्थिती
यावल येथील प्रचार सभेत वरणगावचे गटनेता राजेंद्र चौधरी, नगरसेवक अभिमन्यू चौधरी, गनी पटेल, मनोज करंकाळ, महेश वाणी, माजी नगरसेवक तुकाराम बारी, दिलीप वाणी, डॉ. गणेश रावते,रवी बाविस्कर, अन्सार शेख, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तू कोळी, साकळीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद्र निळे, राहूल चौधरी, विजय सराफ, अमोल देशमुख, शकिलभाई शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदारांना सांगितले विकासाचे व्हिजन
यावलच्या सभेत तरुणांना रोजगार, शेतकर्‍यांसाठी सिंचन व निर्यातक्षम केळी, तसेच मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन अनिलभाऊ चौधरींनी सांगितले. यावलच्या सभेनंतर त्यांनी मारुळमध्ये कॉर्नर मिटींग घेतल्या.

कुटूंब उतरले रींगणात
अनिल चौधरी यांच्या प्रचाराव्यतिरिक्त अन्य सात यंत्रणांकडूनही चौधरींचा प्रचार सुरू आहे. परिवारातील सर्वच सदस्य प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. अनिल चौधरींचे जेष्ठ बंधू तथा भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, अनिल चौधरींच्या सौभाग्यवती ललिता चौधरी, मुलगा धीरज, पुतण्या सचिन आणि निखील, जावई चेतन चौधरी व अन्य जवळचे मित्र व कार्यकर्त्यांकडून एकाच वेळी सात ठिकाणी समांतर यंत्रणेतून प्रचार केला जात आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !