कंडारीसह वरणगावात आमदार संजय सावकारेंच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद

आमदारांचे सुवासिनींनी ठिकठिकाणी केले औक्षण : मतदारांशी साधला संवाद
भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी कंडारी गावात प्रचार रॅली काढली. या प्रसंगी मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत त्यांना आशीर्वाद दिले. ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. दरम्यान, दुपारनंतर आमदार संजय सावकारे यांनी वरणगाव शहरात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधला.
यांचा प्रचार रॅलीत प्रतिसाद
कंडारी येथील प्रचार रॅलीत सरपंच संदीप शिंगारे, डॉ.सूर्यकांत पाटील, यशवंत चौधरी, संजीव तायडे, दिलीप कोळी, हर्षल नारखेडे, दीपक तायडे, राकेश महाजन, अरविंद पाटील, खडका येथील भैया महाजन तसेच चुडामण भोळे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
