आमदार संजय सावकारेंच्या प्रचारार्थ आज वरणगावात खासदार सी.आर.पाटलांची जाहीर सभा

भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील वरणगाव शहरातील भोगावती नदी पात्रातील रेणुका माता मंदिराजवळील भोगावती नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सुरतचे खासदार सी.आर.पाटील व सुरतच्या आमदार संगीता पाटील यांची जाहीर सभा होत आहे. तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता प्रचार रॅली बसस्थानकापासून काढण्यात येणार आहे. प्रचार रॅली प्रभात फेरीमार्गे भोगावती नदीत आल्यानंतर तिचे सभेत रूपांतर होणार आहे. सभेला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी कोलते, शहराध्यक्ष सुनील माळी, सरचिटणीस प्रल्हाद सोनार, कुंदन माळी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे.
