भुसावळातील अपक्ष उमेदवार सतीश घुलेंनी मतदारांशी साधला संवाद


सुवासिनींनी औक्षण करीत दिले आशीर्वाद : मतदारांशी हितगुज करीत समस्याही जाणल्या

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी शुक्रवारी सकाळी भुसावळातील रेल्वे विभागातील नागरीक तसेच कर्मचार्‍यांशी संवाद साधला. प्रसंगी त्यांनी मतदारांच्या अडी-अडचणी जाणून घेत परीवर्तनासाठी आपली उमेदवारी असल्याचे चर्चेदरम्यान सांगितले. दरम्यान, शुक्रवारी दुपारून तालुक्यातील कंडारी, फेकरी, पिंप्रीसेकम, दीपनगर भागात त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष जावून संपर्क साधला. मतदारांच्या विविध समस्यादेखील त्यांनी प्रसंगी जाणून घेत परीवर्तनासाठी आपली उमेदवारी असल्याचे सांगितले. ठिकठिकाणी त्यांना मतदारांकडून आशीर्वादही मिळाले तसेच सुवासिनींनी त्यांचे औक्षणही केले.

परीवर्तनासाठी कौल द्या -सतीश घुले
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या गाठी-भेटी घेत आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी मतदारांशी संवाद साधतांना सांगत आहेत.

प्रचार रॅलीत या पदाधिकार्‍यांचा सहभाग
अपक्ष उमेदवार सतीश घुले यांच्या प्रचार रॅलीत प्रभाकर रणदिवे, प्रतीक पाटील, प्रशांत बर्‍हाटे, महेश जाधव, किशोर तळेले, राजेश चौधरी, सुनील रायकवार, दिलीप टाक, निलेश इंगळे, विवेक गवळी, जमील बागवान, अजय ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !