भुसावळात उद्या आमदार संजय सावकारेंच्या प्रचारार्थ महारॅली

भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शनिवार, 19 रोजी सकाळी 10 वाजता महारॅली काढण्यात येणार आहे. जामनेर रोडवरील भाजपा प्रचार कार्यालय, दर्डा भवनापासून महारॅलीला सुरुवात होणार आहे. भुसावळ मतदारसंघातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, उपसभापती, जिल्हा परीषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष , प्रमुख कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, शाखाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य, मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, सरचिटणीस भालचंद पाटील यांनी केले आहे.
