भुसावळात भर पावसातही आमदार सावकारेंच्या कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शहर व तालुक्याच्या विकासासाठी सेवेची संधी द्या : आमदार संजय सावकारे यांचे कॉर्नर सभेत आवाहन
भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी भुसावळातील प्रभाग क्रमांक सातमधील स्वामी विहारानजीक शुक्रवारी सायंकाळी कॉर्नर सभा घेतली. याचवेळी पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली मात्र आमदार सावकारे बोलत असताना नागरीकांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत भर पावसातही सभेला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. याप्रसंगी आमदार सावकारे यांनी शहर व तालुका विकासाच्या तसेच राज्य व केंद्र शासनाने केलेल्या विविधांगी कामांची माहिती दिली. शहर व तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा सेवेची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी नागरीकांना केले.
भर पावसातही नागरीक कॉर्नर सभेला थांबून
शुक्रवारी सायंकाळी शहरात पावसाच्या सरी बरसल्या. त्याचवेळी प्रभाग क्रमांक सातमध्ये आमदारांची कॉर्नर सभा सुरू झाली मात्र नागरीक व महिला मात्र बसल्या जागीच थांबल्या असल्याचे दिसून आले. याप्रसंगी दीपक धांडे, सतीश सपकाळे यांच्यासह खुशाल जोशी व नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
