रावेर मतदारसंघात आमदार हरीभाऊ जावळेच महायुतीचे अधिकृत उमेदवार


जलसंपदा मंत्री गिरीश महाजन : पक्ष आमदार जावळेंच्या पाठीमागे ताकदीनिशी उभा

रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही, ते आपले जवळचे कार्यकर्ता नसून बंडखोर उमेदवार आहेत, भाजपा-सेना महायुतीचे व पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे हेच आहेत आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष ताकदीनिशी उभा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे काम कराव, असे आवाहन व स्पष्टीकरण यावल येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्याचे जलसंपदा व आरोग्य शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले. डॉ.कुंदन फेगडे यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. तालुक्यातील चोपडा विधानसभा मतदार संघातील दोन जिल्हा परीषद गटांमध्ये ते भाजप कार्यकर्ते बंडखोर उमेदवाराला समर्थन देत त्यांचा प्रचार करीत आहेत त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, असेही महाजन यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
माजी नगराध्यक्ष तथा विद्यतान नगरसेवक अतुल पाटील, डॉ.कुंदन फेगडे, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, भाजप शहराध्यक्ष हेमराज फेगडे, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शरद कोळी, संतोष धोबी सह शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !