विकासाच्या प्रवाहात राहण्यासाठी योग्य उमेदवार निवडून द्या


आमदार हरीभाऊ जावळे : रावेर ग्रामीणमध्ये प्रचार रॅलीला प्रतिसाद

रावेर : पाच वर्षात प्रत्येक गावात विकास कामे केली आहे, कुठे कमी पडलो असेल तर नक्की भर काढू, विकासाची प्रक्रिया सातत्याने राबवायची असून आगामी काळात केळी उत्पादक शेतकरी डोळ्यासमोर ठेवून काम करून दाखवू यासाठी तुमचे मत योग्य विचारधारेला द्या, असे आवाहन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले. शुक्रवारी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत निंभोरा, वाघोड, कुंभारखेडा, चिनावल, विवरा या गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी आमदार जावळे यांचे महिलांनी औक्षण केले तर ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

विकासाला साथ देण्यासाठी मतदारांची साथ गरजेची
आमदार जावळे म्हणाले की, गावांना जोडणारे रस्ते, शेत रस्ते करण्यासाठी तसेच प्रलंबित कामे मार्गी लावून विकासाला गती देण्यासाठी मतदारांची साथ हवी आहे. केंद्र व राज्य सरकारच्या यशस्वी पाच वर्षाचे तुम्ही साक्षीदार आहात, पुढेही मी आपल्या गावाचा व परीसराचा विकास साधण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलिंद वायकोळे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, पंचायत समितीच्या सभापती माधुरी नेमाडे, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पंचायत समिती गटनेते पी.के.महाजन, प्रल्हाद पाटील, पंचायत समिती सदस्य जितु पाटील, भरत महाजन, अमोल पाटील व पदाधिकारी सहभागी झाले. निंभोरा येथील रॅॅलीत सरपंच दिगंबर चौधरी, दुर्गादास पाटील, रोहिदास ढाके, मिलिंद पाटील, ज्ञानदेव नेमाडे, अमोल खाचणे, रवी महाले, मनोज सोनार, सचिन महाले, सुनील पाटील, मधुकर बिर्‍हाडे, अरुण राणे, भारत बोंडे, घमा बोंडे, सुनील पाटील, विनोद पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. चिनावल येथील रॅॅलीत सरपंच भावना बोरोले, परेश महाजन, कृउबा संचालक गोपाळ नेमाडे, योगेश बोरोले, निखील नेमाडे, जितू वानखेडे, राहुल चौधरी, सागर भारंबे, दिलीप भारंबे, राजू पाटील, गोपाळ पाटील, सुनील गाजरे, नारायण नेमाडे, शरद बोंडे, युवराज महाजन, माधुरी महाजन, मोहन लोखंडे, धनश्री नेमाडे, अफसर मौलाना, शेख नदीम, कविता किरंगे, पी.के.महाजन, अमोल पाटील, प्रल्हाद पाटील, राकेश फेगडे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !