जळगावात दारूच्या नशेत भावाचाच केला खून


रामानंद नगर पोलिसांनी संशयीत आरोपीला घेतले ताब्यात

जळगाव : दोघा भावांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यावर धारदार शस्त्र मारून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. संशयीत आरोपीला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

किरकोळ वादातून भावाची केली हत्या
पिंप्राळा, हुडको भागातील रहिवासी प्रल्हाद तानकू मरसाळे यांच्या तीन मुलांपैकी मोठा मुलगा विजय प्रल्हाद मरसाळे हा जैनाबाद परीसरात राहतो तर जय प्रल्हाद मरसाळे (35) व दीपक प्रल्हाद मरसाळे (25) हे पिंप्राळा हुडको परीसरातील मातंग वाड्यात राहतात. शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास जय आणि दीपक यांनी घरी सोबत जेवण केले. जयला दारू पिण्याची सवय असल्याने त्याने शुक्रवारी रात्री मद्य प्राशन केल्यानंतर दोघा भावांमध्ये किरकोळ वाद झाले. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी प्रल्हाद मरसाळेने आपला लहान भाऊ दीपकच्या डोक्यावर कोणत्यातरी वस्तूने प्रहार चढवला तर नंतर पंख्याला फाशी घेतल्याचा देखावा केला. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास वडील प्रल्हाद यांना आरोपी जय मारसाळे याने आरडाओरड करून भावाने आत्महत्या केल्याचे सांगत जागी केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसाचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घरामध्ये डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याचे आढळल्याने आत्महत्या नव्हे तर खून असल्याचे प्रथमदर्शनीच दिसून आले. पोलिसांनी जय मरसाळे याला सकाळी सात वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले असून त्याने रात्रीचा घटनाक्रम सांगितला. त्याच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !