भुसावळातील व्यापार्‍यांशी अपक्ष उमेदवार सतीश घुलेंनी साधला संवाद


भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी शनिवार, 19 रोजी सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली. शहरातील वर्दळीच्या डेलि मार्केट, कपडा मार्केट तसेच मॉडर्न रोड भागातील व्यापार्‍यांची प्रत्यक्ष जावून घेत त्यांच्याशी संवाद साधला. परीवर्तनासाठी आपली उमेदवारी असल्याने मतदारांनी आपल्याला कौल द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. दरम्यान, शहरातील व्यापार्‍यांच्या भेटी-गाठीनंतर फेकरी गेट व दीपनगर गेट भागातही मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या.

ग्रामीण भागातही जोमाने केला प्रचार
गेल्या काही दिवसात अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी भुसावळ तालुक्यातील जाडगावसह मन्यारखेडा, कंडारी, कुर्‍हेपानाचे, दीपनगर, बोहर्डी बु.॥ व खुर्द तसेच कुर्‍हा, साकरी आदी गावांना भेटी देत मतदारांशी हितगुज करीत त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या आहेत. याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ त्यांच्यासोबत आहेत.

परीवर्तनासाठी कौल द्या -सतीश घुले
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या गाठी-भेटी घेत आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !