महाबळेश्वर मॅरेथॉनमध्ये भुसावळातील प्रा.प्रवीण फालक धावले 50 कि.मी.


दहा तासांचे अंतर पार केले अवघ्या सात तास 20 मिनिटात : पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये येण्याचा मिळवला मान

भुसावळ : महाबळेश्वर येथे नुकत्याच झालेल्या महाबळेश्वर एंड्युरोथॉन- 2019 या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा.प्रवीण फालक यांनी 50 किलोमीटर गटात यशस्वी सहभाग नोंदवून भुसावळ शहराचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखीत केले. या गटात 10 तासांचा अवधी होता परंतु फालक यांनी केवळ सात तास 27 मिनिटात हे अंतर पूर्ण करून प्रथम दहा स्पर्धकांत येण्याचा विक्रम नोंदविला.

महाबळेश्‍वरजवळ झाली मॅरेथॉन
महाबळेश्वर पासून 35 किमी अंतरावरील तापोला या अतिदुर्गम गावापासून स्पर्धेला सुरुवात झाली. अतिशय उंच-सखल रस्त्यांमुळे बर्‍याच स्पर्धकांनी स्पर्धा अर्ध्यात सोडली परंतु काही स्पर्धकांनी हे अंतर पार केले. यामध्ये प्रा.प्रवीण फालक यांनी सात तास 27 मिनिटांमध्ये 50 कि.मी. इतके अंतर धावून प्रथम दहा स्पर्धकांमध्ये येण्याचा विक्रम नोंदवला. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी धावपटूंना एकाग्रता, सहनशक्ती, धैर्य संयम इ. गुण आवश्यक असून याचा कस महाबळेश्वर मॅरेथॉन मध्ये लागतो, असे प्रा. प्रवीण फालक यांनी सांगितले. 21, 25, 42 व 50 कि.मी. या विविध गटात ही स्पर्धा आयोजित केली जाते. त्यापैकी 42 व 50 कि.मी. अंतर अतिशय आव्हानात्मक असते. तापोला येथे असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे ‘मिनी काश्मिर मॅरेथॉन’ असेही या स्पर्धेस संबोधिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या कामगिरीमुळे आयोजकांतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रवीण फालक यांनी गत महिन्यात डॉ. तुषार पाटील यांच्यासोबत ‘लडाख मॅरेथॉन’ पूर्ण केली होती. त्याआधी ऑगस्ट महिन्यात ब्रिजेश लाहोटी, तरुण बिरीया, प्रदीप सोलंकी व प्रवीण पाटील या भुसावळ रनर्स सोबत ‘सातारा हिल’ मॅरेथॉन पूर्ण केली होती . त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे (बी.सारा) व पर्यायाने भुसावळचे नावलौकिक सतत उंचावत आहे, असे उपाध्यक्षा डॉ.नीलिमा नेहेते यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या माध्यमातून प्रा.प्रवीण फालक यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरोज शुक्ला, पूजा फालक, स्वाती फालक, पूनम भंगाळे, माधुरी गुजर, आरती चौधरी, डॉ.चारुलता पाटील, स्नेहल चौधरी, चारुलता अजय पाटील, मीना नेरकर, अर्चना भगत, प्रियंका रत्नानी, अखिलेश कुमार, सुनील सोनगिरे, संजू भटकर, गणसिंग पाटील, सचिन मनवानी, प्रवीण वारके, अजय पाटील, रणजीत खरारे, डॉ.निर्मल बलके, प्रवीण पाटील, अशोक पाटील, धीरेंद्र रामटेके, ब्रिजेश लाहोटी, राहुल अग्रवाल, कल्पेश मनवानी, प्रमोद शुक्ला, सागर पाटील, तरुण बिरीया, नकुल असावा, निलेश लाहोटी, विजय पाटील आदी रनर्स उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !