आमदार हरीभाऊ जावळे तर जनसामान्यांचा आधार

विवरा पंचायत समिती गणात प्रचारादरम्यान पंचायत समिती सदस्या योगीता वानखेडे यांचे मत
रावेर : रावेर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे हे गोरगरीब, सामान्य जनतेचे आधार असून त्यांच्या सुख-दुःखात ते धावून येत असल्याने सामान्य जनतेस ते आधार वाटतात, असे प्रतिपादन रावेर पंचायत समितीच्या सदस्या योगिीा वानखेडे यांनी शनिवारी सकाळी विवरा पंचायत समिती गणातील प्रचार बैठकीत केले. बैठकीस परीसरातील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रचाराच्या तोफा थंडावल्या तर तत्पूर्वी आमदार जावळेंच्या प्रचारार्थ सायंकाळी पाच वाजेपूर्वी मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आल्या.
हरीभाऊ जनतेचे खरे नेते
आमदार हरीभाऊ यांच्यासारखा सामान्य कुटुंबातून आलेला नेता जनतेचा खरा नेता आहे. सतत जनतेच्या संपर्कात राहून अडी अडचणी सोडविण्यात ते नेहमीच सदैव पुढे राहिले आहेत, असे पंचायत समिती सदस्या योगीता वानखेडे म्हणाल्या. डी.पी.जळाली, अॅम्ब्यूलन्स हवी, मुंबईस रुग्ण पाठवायचा, मुलांना वसतिगृहात प्रवेश हवा यासारख्या अनेक लहान-मोठ्या सामान्य जनतेला आमदार हरीभाऊंची आठवण येते. एका फोनवर अश्या अनेक आकस्मिक प्रसंगी सहज कुणालाही उपलब्ध होणारे नेते म्हणजे हरीभाऊ जावळे आहेत. शासकीय योजना गोर-गरीब जनतेपर्यंत खर्या अर्थाने नेणारे नेते म्हणजे हरीभाऊ आहेत. यामुळे सामान्य जनतेला ते सतत आपले हक्काचे नेते वाटतात यामुळे रावेर विधानसभा क्षेत्रातील जनता त्यांच्या पाठीशी असल्याने पुन्हा रावेरचे आमदार हरीभाऊच होतीलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी प्रा.जतीन मेढे, मोहिनी पाटील, जयश्री चौधरी, नीता गाजरे आदींची उपस्थिती होती.
