आमदार जावळेंकडून रावेर पूर्व भागातील प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी

पंचायत समिती सदस्य धनश्री सावळे : अहिरवाडीसह खानापूर भागात प्रचार रॅली
रावेर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शनिवारी सकाळी पातोंडी, अहिरवाडी, खानापूर, खिरवड भागात पंचायत समिती व जिल्हा परीषद सदस्यांनी शनिवारी दुपारी प्रचार रॅली काढली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य धनश्री सावळे यांनी आमदार जावळे यांनी रावेर पूर्व भागातील प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लावल्याचे सांगितले. शनिवारी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या, तत्पूर्वी आमदार जावळे यांच्या प्रचारार्थ रावेर मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आल्या. प्रसंगी पदाधिकार्यांनी मतदारांशी संवादही साधला.
रस्त्यांचे प्रश्न मार्गी
धनश्री सावळे म्हणाल्या की, आज आमदार हरीभाऊ जावळे यांच्या माध्यमातून रावेरच्या पूर्व भागाचा कधी नव्हे तो इतका विकास झाला आणि रस्त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागले. सुरवातीच्या काळात रस्त्याच्या कामांना वेळ लागला त्याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात रस्ते हे जिल्हा परीषदेकडे होते त्यामुळे त्यावर पुरेसा निधी मिळत नव्हता त्यामुळे हरीभाउनी त्या रस्त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आणि यात बराच वेळ गेला पण नंतर मोठ्या प्रमाणांत रस्त्यांचे काम मार्गी लागले. याप्रसंगी त्यांनी विविध रस्त्यांच्या कामांची माहिती देत पूर्व रावेर भागातील गावांमध्ये आमदार निधी आणि 25/15 योजनेच्या माध्यमातून विविध विकास काम हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून झाली असल्याचे त्या म्हणाल्या.
