भुसावळात तलवारीच्या धाकावर जीवे ठार मारण्याची धमकी

भुसावळ : उमेदवाराचे प्रचार पत्रके वाटप करीत असतांना पाळीव कुत्रा अंगावर आल्याने त्यास हाकलण्यासाठी दगड मारल्याचा राग पाळीव कुत्र्याच्या मालकाला राग आल्याने त्याने पत्रके वाटणार्यास शिवीगाळ केली तसेच त्याच्या घरी तलवारी नेवून त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात राहुल सोनटक्केविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संतापात काढल्या तलवारी
शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र किशोर बुटी हा युवक मेथाजी मळा, गरूड प्लॉट भागात उमेदवाराच्या प्रचार पत्रकाचे व वोटर स्लिपचे वाटप करीत असतांना राहुल सोनटक्के (रा.दश्र मंदीराजवळ) यांचा पाळीव कुत्रा देवेंद्र यांच्या अंगावर धावून आल्याने देवेंद्रने त्याला हाकलून लावण्यासाठी दगडाने हाकलण्याचा प्रयत्न केला. याचा राहुल सोनटक्के याला राग आल्याने त्याने देवेंद्रला शिवीगाळ केली. यावेळी देवेंद्रने कुठल्याही प्रकारचा वाद न घालता सरळ घरचा रस्ता धरला मात्र राहुल सोनटक्के याने देवेंद्र याचे घर गाठून देवेंद्रला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्याच्या हातात दोन तलवारी होत्या, अशा प्रकारची फिर्याद देवेंद्रचे वडील किशोर बुटी यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर तपास करीत आहेत.
